Home अपरिचित इतिहास छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शहराच्या नावांचा प्रवास

छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शहराच्या नावांचा प्रवास

by sinhasan

छत्रपती संभाजीनगर :-
खडकी (१६१०): निजामशाहीचे वजीर मलिक अंबर यांनी या शहराची स्थापना करून याचे नाव ‘खडकी’ ठेवले होते.

फत्तेनगर (१६२६): मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फत्तेखान याने याचे नाव बदलून ‘फत्तेनगर’ केले.

औरंगाबाद (१६५३): औरंगजेबाने या शहराचे नाव बदलून स्वतःच्या नावावरून ‘औरंगाबाद’ केले आणि याच काळात खुजस्तेबुनियाद’ ही पदवीही मिळाली.

छत्रपती संभाजीनगर (२०२३): महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता या शहराचे अधिकृत नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात आले आहे.

पुणे:-
इ.स. १७०३ ते १७०५ च्या दरम्यान औरंगजेबाने पुण्याचे नाव बदलून ‘मुहीयाबाद‘ असे केले होते. औरंगजेबाचा नातू किंवा परनातू ‘मुही-उल-मिल्लत’ (Muhi-ul-Millat) याचा पुण्यात मृत्यू झाला होता, त्याच्याच स्मरणार्थ औरंगजेबाने हे नाव दिले असे मानले जाते.

श्री. राम वाघोले
इतिहास अभ्यासक व लेखक
मो: 9881343063
परिंचे, पुणे.

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.