करवीर रियासत

दक्षिण भारतातील महत्त्वाचे संस्थान

by sinhasan

करवीर संस्थान हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे संस्थान.
मराठ्यांच्या इतिहासात त्यास असाधारण असे महत्त्व आहे. कृष्णा, कोयना, कुंभी कासारी, हळदी, तुळशी, हिरण्यकेशी, घटप्रभा, पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या वास्तव्यामुळे सुपीक असणारा हा प्रदेश.

१७१० ते १९४९ हा करवीर संस्थानचा काळ. करवीर, पन्हाळा, भुदरगड, गडहिंग्लज, शिरोळ आणि आळते अशा सहा पेठ्यात (तालुक्यांत) हे संस्थान विभागलेले होते.शिरोळपासून ते कर्नाटकातील रायबागपर्यंत या संस्थानची सीमा. पन्हाळा, करवीर ते कोल्हापूर हा या संस्थानचा प्रवास सामाजिक व ऐतिहासिकदृष्टय़ा फार महत्त्वाचा आहे. या संस्थानाने अनेक कर्तबगार इतिहासपुरुष महाराष्ट्राला दिले आहेत. महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज ते राजर्षी शाहू महाराजांच्या देदीप्यमान कामगिरीचा संबंध या संस्थानाशी आहे.

छत्रपती शाहूंची कारकीर्द महाराष्ट्राच्या समाजकारणात फार महत्त्वाची आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांनी समाजहिताची व लोकोपयोगी कामे केली. समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग, शेती, कला व क्रीडा या क्षेत्रांत शाहू महाराजांनी केलेली कामे मूलभूत स्वरूपाची होती. नवसुधारणावादी प्रबोधन शतकाचा सांगाती व नव्या काळाचे सांस्कृतिक नेतृत्व करणारे राजे होते.

मराठा राज्यसंघातील प्रमुख घटकराज्यांपैकी एक महत्वाच राज्य म्हणजे करवीर रियासत ऊर्फ कोल्हापूर. देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी‍ एक शक्तीपीठ. प्रलयकाळात देवीने आपल्या हातांनी (करांनी ) या शहराला उचलून दुसरीकडे सुरक्षित ठेवले म्हणून करवीर किवा करवीर पीठ असेही म्हंटले जाते.

या शहराचे मूळ इ स २२५ ते १२१० या कालखंडात सापडते. या प्रदेशात वाकाटक ,कदंब, शूद्रक व मौर्य यांची सत्ता होती . नंतर चालुक्य ,राष्ट्रकूट व शिलाहारांची सत्ता होती. १२१० मध्ये शिलाहारांचा पराभव देवगिरीच्या यादवांनी केला.पुढे यादवांचा पराभव होऊन मुस्लीम सत्तेचा अंमल होऊन बहामनी सलतनीच्या राजवटीत हा प्रदेश गेला.

पुढे १६५९ साली शिवाजी महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात सामील केला. आदिलशाहीने काढलेल्या मोहिमेत पन्हाळा १६६० खाली त्यांच्या ताब्यात गेला. १६७३ साली महाराजांनी पन्हाळा व कोल्हापूर परत स्वराज्यात सामील केला.

पन्हाळा किल्ला हा करवीर संस्थानाच्या जडणघडणीत महत्वाचा साक्षीद‍ार होता. संभाजी महाराजांनी पन्हाळ्याहून नजरकैदेतून सुटका करून रायगडावर येऊन राजारामांना पदच्चुत करून मराठ्यांचे छत्रपतीपद मिळवले. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर ‍राजाराम महाराज गादीवर आले .पुढे औरंगजेबाच्या सैन्याने रायगडला वेडा घातला असता राजाराम महाराज तेथून निसटून जिंजीला गेले. पुढे सिंहगडावर त्यांचे निधन झाले.
राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराबाईसाहेब यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीय यांना सातारा गादीवर बसवले.
१७०७ साली ओरंगजेबाच्या मृत्युनंतर मोघलांच्या कैदेत असलेले संभाजीपूत्र शाहू यांची सुटका होऊन ते मह‍ाराष्ट्रात आले. शाहू हेच मराठा राज्याचे खरे उत्तराधिकारी आहेत असे अनेकांना वाटू लागले. त्यातच  ऑक्टोबर महिन्यात साताराच्या गादीवर हक्क सांगण्यासाठी ताराबाईसाहेब व शाहू यांच्यात लढाई झाली. यात शाहूंचा विजय झाल्यावर त्यांनी सातारा ताब्यात घेऊन राज्याभिषेक करवून घेतला त्यावेळी ताराबाईसाहेब पन्हाळा रांगणा वरून कोकणात गेल्या होत्या.
शाहूंच्या आक्रमणाला रांगण्याने खिळ टाकली व शाहू परत सातारा येथे आले. ताराबाईसाहेब कोल्हापुरास परत आले. शाहूंच्या ताब्यातील पन्हाळा त्यांनी परत जिंकला व परत एकदा कोल्हापूर ताराबाईसाहेबांन कडे परत आला.
तारबाईसाहेबांनी मराठा राज्याच्या छत्रपतींच्या दुस-या पातीची स्थापना करुन राज्याला बळकटी देण्याच काम केल.१७१० नंतर बिघडत चाललेल्या परिस्थिती ने १७१४ साली कोल्हापूरात पन्हाळ्यावरील राजवाड्यातील राज्यक्रांतीत सत्तांतर होऊन द्वितीय संभाजी गादीवर आले.( १७१४ – १७६० ) या मध्ये शाहू सोबत १७३१ मध्ये वारणेजवळ निर्णायक लढाई होऊन यात कोल्हापूरच्या संभाजीराजे यांचा पराभव झाला. लढाई जिंकून ही त्यांनी तह केला व राजशिष्ठाचार सांभाळून ‍कोल्हापूर व सातारा यांच्या सीमा नक्की करण्यात आल्या.

कोल्हापूरचा सारा सरंजाम सातारा येथे नेण्यात आला. ताराबाईसाहेबांची परत कोल्हापूरला जाण्याची ईच्छा नसल्याने त्या सातारा येथेच राहील्या तर राजसबाई व इतर जणांना पंतप्रधानींनी शाहूंच्या सांगण्यावरून परत पन्हाळा येथे पोहचवले. पुढे सातारा येथेच ताराबाईंच निधन झाले.
संभाजीराजे द्वितीय कोल्हापूर यांच्या नंतर खानवलकर घराण्यातून दत्तक घेतलेले शिवाजीराजे तृतिय यांची कोल्हापूर गादीवर नियुक्ती झाली. ( १७६२ – १८१३) .
शिवाजीराजे तृतीय यांच सिधोजीराव यांच्याशी वैर असल्यान पटवर्धंनानी घातलेल्या कोल्हापूरच्या वेढ्यात सिधोजीरावांनी कोल्हापूरात धुमाकाळ घालून शिवाजी राजे यास उपद्रव दिला व कोल्हापूरचा काही भाग जिंकला.
या सर्व घटनांवर ब्रिटीश ईस्ट कंपनी लक्ष ठेऊन होती. संधी मिळताच एलफिस्टनने कोल्हापूरच्या राजांना सिधोजीरावा विरुद्ध मदत करण्यासाठी संधी साधून त्यांच्याशी वाटाघाटी करून १८१२ साली तह‍ची कलम केली. यात कोल्हापूर राज्य ब्रिटीशांचे अंकित संस्थान म्हणून बनत चालले. यात पुढे १८१३ साली शिवाजीराजे यांच निधन झाल. पुढे कोल्हापूर गादीवर संभाजीराजे तृतीय हे गादीवर आले. (१८१३ -१८२१ ) हे आबासाहेब म्हणून जास्त प्रसिध्द होते. या राजसत्तेला मर्याद‍ा आल्याने किरकोळ भांडण सुध्द‍ा जोर धरत होती.यात आबासाहेबांची हत्या झाली.
आबासाहेबां नंतर शहाजी महाराज गादीवर आले (१८२१ -१८३८) . य‍ांच्यात पण इंग्रज सरकार बरोबर तहनामे होऊन कोल्हापूरचे लष्करी सामर्थ्य कमी झाले व मुलकी कारभारातील सत्तापण कमी झाली.
शहाजीमहाराज ( बुवासाहेब ) यांच्या नंतर कोल्हापूर च्या गादीवर शिवाजीमहराज चौथे ( बाबासाहेब ) गादीवर आले. (१८३८ -१८६६ ) यात शैक्षणिक व सामाजिक विकास झाला व्यापार व दवाखाने चालू झाले. बाबासेबांच्या निधनानंतर पाटणकर घराण्यातून राजाराम महाराज कोल्हापूर गादीवर दत्तक आले . ( १८६६ -१८७० ). नंतर शिवाजी महाराज पंचम यांची कारकीर्द ( १८७१ -१८८३ ) येवढी झाली.त्यांचे अहमदनगरच्या किल्यात निधन झाले.
त्यानंतर घाटगे कागलकर घराण्यातील यशवंत दत्तक घेऊन त्याचे नाव शाहू ठेवण्यात आले.१८९४ रोजी शाहूमहाराजांना कोल्हापूर संस्थानचा राज्याधिकार मिळाला. १९०० साली महाराजा ही उपाधी लावण्याचा अधिकार मिळाला. १९१९ साली राजर्षी हि उपाधी बहाल करण्यात आली.त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरची ओळख एक प्रगतशील संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. या संस्थानाला ब्रिटीश राजवटीने एकोणीस तोफांच्या सलामींचा मान दिला होता. १९२२ मध्ये राजर्षी शाहूमहाराज यांच निधन झाले.
कोल्हापूर च्या गादीवर त्यांचे पुत्र राजाराम महाराज दुसरे गादीवर आले. (१९२२ -१९४०) .
त्यानंतर प्रतापसिंह दत्तक पुत्र हे गादीवर आले .हे शिवाजी सहावे असे नाव ठेवण्यात आले. (१९४२ -१९४६ ) .पुढे १९४७ रोजी परत एकदा दत्तकविधान झाले व विक्रमसिंह ऊर्फ शहाजीराजे द्वितीय हे गादीवर आले.कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्याच काम यांनी केल. १९४९ रोजी विलीनीकरणाची प्रक्रिया पुर्ण झाली. (१९४७ -१९४९) .पुढे १९८३ रोजी त्यांचे निधन झाले.

 

संतोष मुरलीधर चंदने 
इतिहास व मंदिर अभ्यासक
चिंचवड, पुणे

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: