Home इतिहासाच्या पाऊलखुणा गंडभेरुंड म्हणजे काय ?

गंडभेरुंड म्हणजे काय ?

by sinhasan

पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने नरसिंहाचे (अर्धा मनुष्य अर्धा सिंह) रूप धारण केल्यानंतर आपले दैवी कार्य पूर्ण केल्यानंतर, नरसिंह आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि विश्वाचा नाश करण्यास वळले. नरसिंहाने हिरण्यकश्यप राक्षसाचा वध केल्यावर..राक्षसी गरम रक्ताच्या चवीमुळे भगवान नरसिंहाने त्याचे भयानक रूप सोडलेच नाही आणि देवतांनाच त्यांचा त्रास होऊ लागला.. आता परमपित्या पालकाची अधिक भीती वाटू लागली. देवतांनी शिवाला विनवणी केली तेव्हा शिवाने शरभ अवतार घेतला.तो अवतार घेताना त्यांचा खालचा एक भाग-सिंहाचा आणि वरचा भाग -पक्षाचा म्हणून अवतरित झाला…आपल्या पंखांत त्यांनी , देवी दुर्गा आणि काली यांना येण्याचे आवाहन केले..दुर्गा व काली यांनी त्या पंखात प्रवेश करून, नरसिंहाला मिठी मारली आणि त्याला शांत केले…अशी कथा शरभतंत्र मध्ये येते…

परंतु यात नरसिंह (विष्णू) मधून आणखी एक भयंकर रूप उदयास आले.. गंडभेरुंड, दोन डोके, भयंकर दातांच्या .. रंगाने काळा आणि विस्तीर्ण चमकणारे पंखासह नरसिंहाची (विष्णू) विध्वंसक शक्ती दोन मुखी पक्ष्याच्या रूपात अवतरीत झाली.. गंड गंडभेरुंडांचा उल्लेख भगवद्पुराणात नाही परंतु काही प्रादेशिक ग्रंथांमध्ये विशेषतः शैव तंत्रमार्गी ग्रंथ आणि काही पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे.

नरसिंहाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने शरभाचे रूप घेतले. परंतु भगवान नरसिंहाने दोन डोकी असलेले पक्षी-प्राण्यांचे आणखी भयंकर रूप धारण केले – गंडभेरुंड..शरभ (शिवा) सोबत अठरा दिवस भयंकर लढू लागली. अठराव्या दिवसानंतर, नरसिंह (विष्णू) शेवटी त्याच्या असीम भयंकर उर्जेवर मात करू शकले, आणि त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. विष्णू आणि शिवाच्या उग्र रूपांपासून (बेरुंन्डा आणि शरभ) विश्वाला वाचवण्यासाठी विष्णूने लढा थांबवला. नरसिंह (विष्णू) आणि शिव शेवटी त्यांच्या नेहमीच्या रूपात परत आले.

 

तर तंत्रिक पंथात गंडभेरुंड (दोन डोके असलेला पक्षी) म्हणून भगवान नरसिंह हा प्रसिद्ध आहे.. भगवान विष्णूचा एक दुर्मिळ तंत्रिक अवतार आहे आणि मुख्यतः दक्षिण भारतात त्याची पूजा केली जाते. गंडभेरुंड, किंवा गंड भेरुंडा.. नरसिंह, दोन डोकी असलेले पक्षी आणि प्राणी यांचे संयोजन आहे आणि ते भगवान नरसिंहाकडून प्रकट झाले आहेत कारण तो आपला राग नियंत्रित करू शकत नव्हता. असेही मानले जाते की गंडभेरुडदा अवतार हे भगवान शिवाच्या सरभ स्वरूपाचे अवतारास उत्तर होते. तो दोन पंथाचा मधील वाद होता शिव आणि वैष्णव पंथातील वादातून याची कथा तयार झाली..शिवाला शैव ग्रंथातून विष्णूपेक्षा मोठं आणि श्रेष्ठ दाखवताना त्यांच्या नृसिहं अवताराचा वध शिवाने शरभ रूपात केला त्या शरभ अवतारास उत्तर म्हणून गंडभेरुंड या काल्पनिक प्राण्यांची निर्मिती केली गेली. .वास्तविक तंत्रमार्गात एखादया देवतेच्या मूळ शक्ती तत्वास इतर तत्वाशी संयोग करून नव्या देवतेची निर्मिती करता येते..तंत्रमार्ग हा अतिशय गूढ आहे…

भगवान नृसिंहाचे 8 मुखी गंडभेरुंडाच्या रूपात ही मूर्ती आहेत ज्याला “अष्ठमुख गंडबेरुंड” म्हणतात. “अष्ठमुख गंडबेरुंड” चे आठ रूप आहेत गंडभेरुंड पक्षी राजा ..नृसिंह मृगराज ..महा व्याघ्र .. हयग्रीव … आदि वराह … अघोरा वानरेंद्र … महा गरुड … भल्लुका….गंडभेरुंडचे सर्वात प्रसिद्ध मूर्ती श्रीशैलम येथे आहे त्यानंतर म्हैसूर मध्ये सापडते. गंडभेरुंडाच्या रूपाचा पक्षी हा म्हैसूरचे राज्यकर्ते वाडियार यांचा शाही लोगो आहे.तोच लोगो कर्नाटक सरकारने घेतला..पुढे कर्नाटक राज्याचेही प्रतीक चिन्ह म्हणून प्रसिद्ध आहे..आंध्रप्रदेशातील हैदराबादजवळील श्री यादगिरी मंदिरात गंडभेरुडदाच्या मूर्तीची पूजा केली जाते. कर्नाटकातील बल्लीगावी येथे गंडभेरूडचे शिल्प आहे. गंडभेरुडच्या मूर्ती, चित्रे आणि शिल्पे अत्यंत दुर्मिळ आहेत आणि जी उपलब्ध आहेत ती प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळतात.

विशाल फुटाणे
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती संशोधक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ सोलापूर. 8888113111

Vishal phutane
MA. MPhil. PhD
Ancient Indian history, culture, and archaeology

Solapur.  8888113111

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.