पाश्चिमात्य मंडळींना डॉक्युमेंटेशन करण्याची, प्रवासातील मार्गांचे नकाशे काढण्याची, नोंदी लिहून ठेवण्याची, एखादी अनोळखी गोष्ट दिसली कि त्याचे स्केच काढून ठेवण्याची भारी हौस. याचं कारणही तसंच होतं म्हणा. स्वतःचा देश सोडून बाहेर पडलेल्या या दर्यावर्दी, प्रवासी मंडळींना नकाशे, नोंदी, स्केचेस यांचं महत्व माहित होतं. त्यांचा उपयोग कसा करायचा याचे ज्ञान होते. म्हणून त्यांचे शासक एखाद्या मोहिमेवर निघालेल्या जहाजावर आर्टिस्ट, लेखक, वैज्ञानिक इ. मंडळींचा आवर्जून समावेश करीत किंवा सरकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करीत. त्यामुळे पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रज, डच इ. मंडळींनी सोळा – सतराव्या शतकात अनेक नकाशे तयार केले. भरपूर डॉक्युमेंटेशन केले, रिपोर्ट्स तयार केले, पत्रे लिहिली. आज इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला या लिखित साधनांचा प्रचंड फायदा होतो.
पोर्तुगीजांनी सतराव्या शतकात गोव्याचे अनेक नकाशे तयार केले होते. त्यातून त्यांना इथल्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करणे शक्य झाले होते. खाली असाच एक नकाशा दिला आहे. त्यात गोवे बेटाचा अतिशय जुना नकाशा आहे.
photo : Antique map of Old Goa (Velha Goa) by Braun & Hogenberg 1572-1624
संदीप स.मुळीक.
दुर्ग अभ्यासक, मुंबई