श्री पावकेश्वर मंदिर
सैदापूर. ता. कराड जि. सातारा
कृष्णा-कोयना नदीच्या पवित्र संगमावर वसलेले सैदापूर गाव. या नगरीस प्राचीन असा वारसा लाभला आहे.
१७ व्या शतकापर्यंत हे गाव शिवापूर म्हणून ओळखले जायचे. प्रसिद्ध अशा पावकेश्वर मंदिरामूळे हे गाव सिध्दपूर म्हणून प्रसिध्द झाले. पुढे मोघली आक्रमणानंतर गावाचे नाव बदलून सिध्दपूरचे सैय्यदनगर तर पूढे त्याचा अपभ्रंश सैदापूर झाले.
श्री पावकेश्वराच्या बांधकामाचा कालखंड निश्चित सांगता नाही आला तरी बाहेरील भाग सुमारे दोनशे वर्षापूर्वीच आहे.
मंदिरासमोरील भव्य ऊंच दिपमाळ.
पूर्व व उत्तर दिशेला महाद्वार.चारही बाजूनी प्रशस्त तटबंदी.
उत्तरद्वाराला लागूनच लांबलचक प्रशस्त ओवऱ्या
मंदिराच्या मागून कृष्णा नदी वाहते.काळाच्या ओघात बाह्य भागाची बरीच पडझड झाली आहे. चारही बाजूने तटबंदींच्या साह्याने आतमध्ये असलेले श्री पावकेश्वराच शिवमंदिर आहे.
सैदापूर मधील हे श्री पावकेश्वराच पुरातन हेमाडपंती बांधणीच मंदिर.
भव्य प्रदेशद्वारातून आत गेल्यावर समोरचा नंदीमंडप नष्ट झाला असून आत्ता फक्त तळखडे पाहायला मिळतात.
सभामंडप अनेक दगडी खांबावर उभा असून त्यावर अनेक शिल्प , शुभचिन्ह, शरभ, देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.
गाभाराच्या प्रवेशद्वारावर गणपती तर उंबरठयावर शुभचिन्ह कोरलेले आहे.
गाभा-यात शिवलिंग असून त्याची नित्य पूजा केली जाते.
संतोष मुरलीधर चंदने ,
इतिहास व मंदिर अभ्यासक
चिंचवड, पुणे