आमच्याबद्दल
भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास.
असे म्हणतात की, ज्यांना इतिहास नाही त्यांना भविष्य नाही. भविष्य घडविण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भूतकाळातील घडामोडींचा इतिहास अवगत हवा. आपल्या सभोवताली असलेल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. प्राचीन गुहा, दुर्ग, लेणी, मंदिराचे अवशेष, समाधीस्थळे, मूर्तीशिल्प, वीरगळ, शिलालेख, ताम्रपट, जुनी कागदपत्रे, शस्त्रे, निरनिराळ्या राजवटींची नाणी, तत्कालीन वापरातल्या वस्तू, दुर्मीळ चित्रे, छायाचित्रे या सर्व इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. यावरून इतिहास संशोधकांनी प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासाचा मागोवा घेतला आहे.
दुर्दैवाने आज या ऐतिहासिक वस्तू, वास्तू व दस्तऐवजाकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. पण अवशेषरूपाने उरलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीची व गौरवशाली इतिहासाची ओळख भावी पिढीला करून देणे हे निश्चितच आपल्या हातात आहे.
सिंहासन वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना खरा इतिहास माहिती व्हावा हा एकमेव उद्देश आहे.